पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूनी एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता मनसेच्या नेत्यांनी थेट शिवसेनेच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
ट्रम्पपासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणारे आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका. मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये, असे ट्विट करत मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
संदीप देशपांडेंनी पुढे म्हटलंय की, जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये कोणाचे नाव घेतले नसले तरी उबाठाचे खासदार संजय राऊत यांना नाव न घेता हा टोला लगावल्याचे बोलले जात आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, ट्रम्प पासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणाते आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका .मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये .जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी उबाठाच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
संदीप देशपांडेंनी काल राज ठाकरेंच्या एका जुन्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला होता, यामध्ये राज ठाकरे मराठी माणसासाठी पायही चाटू वेळ पडल्यास मराठी माणसासाठी पाय हीं छाटू आणि मराठी माणसाच्या नावावर स्वार्थ साधायचा प्रयत्न केलात तर अद्दल ही घडवू. … असे वक्तव्य करताना दिसून येत आहे.
दोन दिवसांपूर्वी संदीप देशपांडे म्हणाले होते की, सध्या मनसे कुणा बरोबर युती करणार या पेक्षा महत्वाचा आहे ज्या पद्धतीने आड मार्गाने हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होत आहे त्याला विरोध करणे आणि नुसता विरोध नाही तर सगळ्या मराठी माणसांनी एकत्र येऊन टोकाचा विरोध करणं .भाषा जगली तरच आपण जगू, असे त्यांनी म्हटले होते.


