Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मुक्ताई नगर राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघातात तरुण ठार !
    क्राईम

    मुक्ताई नगर राष्ट्रीय महामार्ग भीषण अपघातात तरुण ठार !

    editor deskBy editor deskJune 21, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    तालुक्यातील वरणगाव येथील मुक्ताई नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात फैजपूर येथील शेख नशिर शेख करीम कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, फैजपूर) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास बोहर्डी गावाजवळ घडली. वरणगाव पोलिसात दुचाकी स्वारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सूत्रांच्या माहिती नुसार शेख नशिर हे त्यांचा मित्रासोबत केळीची बिजवाई भरण्याचे काम आटोपून टिव्हीएस मोटारसायकल (एमएच-१६- सी एच ५८४३ वरून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल शिवांशी हॉटेलजवळ संपले. पेट्रोल भरण्यासाठी नशिर कुरेशी हे पायी इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर जात असताना डिव्हायडर क्रॉस करताना वरणगाव कडून भरधाव वेगाने येणाऱ्या मोटारसायकल एम एच-१९ डि ई – २३७३ ने त्यांना जोरात धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की नशिर कुरेशी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात घडवून मोटारसायकल चालक घटनेनंतर पसार झाला. उपस्थित नागरिकांच्या मदतीने मृतास वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, वैद्यकिय अधिकारी डॉक्टर रुपेश उगले यांनी त्यांना मृत घोषित केले.

    फिर्यादीने संबंधित मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली असून, वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित कुमार बागुल यांचे मार्गदशनाखाली पुढील तपास पोहे कॉ प्रेमचंद सपकाळे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.