जळगाव, क्रांतिकारी ख्वाज्याजी नाईक यांचा पुतळा अनावरण कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मान्यवरांसह मंत्री महोदय उपस्थित होते. या मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते असून या कार्यक्रमाचे विशेष लक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे व नुकताच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उपस्थिती होती. एकनाथराव खडसे यांनी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे अशी प्रतिक्रिया देत अनेकांच्या भुवया उंचावल्या तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे पूर्वा श्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असून त्यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे. देवकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. निमंत्रण वाटप कोणी केले हा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे.


