भुसावळ : प्रतिनिधी
येथील मुस्लीम कॉलनीतील विवाहिता हिनाबी आशीफ शाह (वय ३०) हिचा पैशांसाठी छळ केल्याप्रकारणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती आशीफ शाह याने वेगवेगळ्या कारणांसाठी तिच्या वडिलांकडून २० हजार व नंतर ५० हजार रुपये मागून घेतले.
दुचाकी खरेदीसाठी मागणी केल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी भीतीपोटी पैसे दिले. मात्र त्यानंतरही छळ सुरूच राहिला. याप्रकरणी पती आशीफ शाह, सासू समाबी शाह, नणंद सलमाबी शाह, दुसरी नणंद शकलीबी आणि तिचा पती फिरोज शाह यांनी वेळोवेळी पैशांची मागणी, शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीचे प्रकार केले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.



