जळगाव प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन व अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने सुरू असलेल्या ‘ज्येष्ठ नागरिक सहाय्यता दूत’ प्रशिक्षण शिबीराचा उद्या शनिवार दि.२१ ऑगस्ट रोजी समारोप होणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पन्नास ‘सहाय्यता दूत’ पहिल्या टप्प्यात तयार केले जात असून त्यासाठी १७ ऑगस्ट पासून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. उद्या शनिवारी दुपारी २ वाजता या प्रशिक्षणाचा समारोप होणार असून यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती रंजना पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांची उपस्थिती राहणार असून प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार अध्यक्षस्थानी राहतील अशी माहिती विभागाचे प्रभारी संचालक प्रा.मनिष जोशी यांनी दिली.