Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
    क्राईम

    लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

    editor deskBy editor deskJune 19, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहे. या नवीन योजनेबाबत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. यामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मिळून पतसंस्था सुरु केली जाणार आहे.

    याबाबत बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या ८ मार्च २०१९ रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी वार्ड प्रभाग ठिकाणी पतसंस्था स्थापन केली जाणार आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई येथे ही पतसंस्था स्थापन केली जाणार आहे. ही पतसंस्था स्थापन करण्यासठी सभासद संस्था १ हजार असणे गरजेचे आहे.

    या संस्थेच्या नोंदणीवेळा १५ लाख रुपयांचे भांडवल असणे गरजेचे आहे. भांडवल असेल तरच पतसंस्था स्थापन करण्यासाठी परवानगी दिली जाईल. उर्वरित महापालिका ठिकाणी ८०० सदस्य असणे गरजेचे आहे. पतसंस्थेच्या नोंदणीवेळा दहा लाख रुपयांचे भांडवल निश्चित करण्यात आले आहे.त्यामुळे आता लाडक्या बहि‍णींना पतसंस्थेची सदस्य होण्याची संधी मिळणार आहे.

    लाडक्या बहिणी जूनच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारत आहेत. दरम्यान, या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.