जळगाव : प्रतिनिधी
मॉर्निंग वॉक करीत दुचाकीने असताना धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले सतीश एकनाथ सुलक्षणे (५६, रा. नागेश्वर कॉलनी) यांचा उपचार सुरू असताना बुधवारी (१८ जून) मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, डीटीपी ऑपरेटर असलेले सतीश सुलक्षणे हे सोमवारी (१६ जून) रोजी सकाळी ७ वाजता फिरण्यासाठी गेले होते. मायादेवी मंदिराजवळ एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. ते गौरांग सुलक्षणे यांचे वडील होत.


