• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरट्यांची दहशत कायम : इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या गोडावूनमधून ३५ लाखांचा सामान लंपास !

editor desk by editor desk
June 19, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील आठवडे बाजार परिसरातील डिस्को टॉवर इलेक्ट्रॉनिक्स दुकानाच्या गायत्री नगरमधील गोडावूनमधून चोरट्यांनी ३५ लाख रुपयांचा इलेक्ट्रॉनिक सामान लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे..

सविस्तर वृत्त असे कि, नंदलाल मिलकीराम मकडीया (वय ६२) हे श्रीहरीनगर, सिंधी कॉलनी, येथील रहिवासी असून, आठवडे बाजारात त्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, हे गोडावून गायत्री नगरमधील रेणुका माता मंदिराजवळ आहे. १५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता, एका ग्राहकाला कुलर दिल्यानंतर मकडीया है गोडावून बंद करून घरी परतले; परंतु १६ जून रोजी सकाळी ८:४० वा. शेजारील व्यापारी जितेंद्र पाचपांडे यांनी फोन करून गोडावूनचे शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती त्यांना दिली.

मकडीया व त्यांचा मुलगा सनी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, गोडावूनचे शटर उचकटलेले दिसून आले. आत तपासणी केली असता, मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरीस गेलेल्याचे लक्षात आले. गोडाऊनमधून ११ फ्रीज, ९ वॉशिंग मशीन, ५८ एसी इंडोअर युनिट्स, ४२ एसी आउटडोअर युनिट्स, ५९ एलईडी टीव्ही (३२ इंच), ४४ एलईडी टीव्ही (४३ इंच), ७ एलईडी टीव्ही (५५ इंच) असा एकूण अंदाजे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे मकडीया यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी १७ जून रोजी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोरांचा शोध घेतला जात आहे.

Previous Post

धरणगाव : भाव नसल्यामुळे शेतकऱ्याने चक्रीच्या पिकावर फिरवले रोटाव्हेटर !

Next Post

खळबळजनक : विहिरीत आढळला बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा मृतदेह; खुनाचा संशय

Next Post
खळबळजनक : विहिरीत आढळला बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा मृतदेह; खुनाचा संशय

खळबळजनक : विहिरीत आढळला बहादरपूरच्या व्यापाऱ्याचा मृतदेह; खुनाचा संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group