पुणे : वृत्तसंस्था
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी वारीसाठी पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले. देहू गावापासून निघालेल्या या पालखीत विठ्ठल-रखुमाईच्या भेटीची ओढ असणाऱ्या हजारो वारकऱ्यांचा समावेश आहे.
संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा हा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संत तुकारामांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर तुकोबांची पालखीचे पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. तत्पूर्वी, येथील मुख्य मंदिराजवळील शिळा मंदिराच्या समोर वारकऱ्यांनी फुकडी खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी टाळ – मृदुंगाचा गजर तुकोबांचे नामस्मरण केले जात होते. श्री संत तुकाराम महाराज संस्थानने यंदाच्या सोहळ्यासाठी 3 बैलजोड्या खरेदी केल्या आहेत.
प्रमुख दिंड्याच्या उपस्थित व वारकरी भाविक भक्तांसह हरिनामाच्या गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात, गरुड, टक्के यांच्या समवेत सायंकाळी 5 वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणा घालून मुख्य मंदिरातून प्रस्थान होईल. सायंकाळी 6.30 वाजता पालखी प्रस्थान सोहळा श्री तुकोबारायांच्या आजोळी म्हणजे इनामदारसाहेब वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावणार आहे. त्या ठिकाणी आरती होऊन रात्री देहूकर महाराजांचे कीर्तन, हरिनामाचा जागर असे धार्मिक कार्यक्रम होतील. कसा आहे तुकोबांच्या पालखीचा मार्ग?
18 जून- देहूतून प्रस्थान 19 जून- आकुर्डी 20 जून- नाना पेठ, पुणे 21 जून- निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे 22 जून- लोनी काळभोर 23 जून- यवत 24 जून- वरवंड 25 जून- उंडवडी गवळ्याची 26 जून- बारामती 27 जून- सणसर 28 जून- निमगाव केतकी, 29 जून- इंदापूर 30 जून- सराटी 1 जुलै- अकलूज 2 जुलै बोरगाव श्रीपूर 3 जुलै- पिराची करौली 4 जुलै- वाखरी 5 जुलै- पंढरपूर
बेलवडी येथे पहिले गोल रिंगण
काटेवाडी येथे मेंढ्यांचे रिंगण इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण सराटी येथे पादुकांना नीरास्नान अकलूज येथे तिसरे गोल रिंगण माळीनगर येथे पहिले उभे रिंगण तोंडले बोंडले येथे धावा बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण वाखरी येथे पादुका आरती आणि तिसरे उभे रिंगण यंदा तिथीचा क्षय झाल्याने आंथुर्णे येथील पालखीचा मुक्काम रह यंदा पालखी रथाच्या पुढे 27 व मागे 370 दिंड्या सहभागी होणार


