Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एरंडोल तालुक्यात १३ वर्षीय बालकाची हत्या !
    क्राईम

    एरंडोल तालुक्यात १३ वर्षीय बालकाची हत्या !

    editor deskBy editor deskJune 17, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल : प्रतिनिधी
    तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय मुलाची गळा चिरून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. तेजस गजानन महाजन (वय १३) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, हत्येमागे नरबळीचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत तपास तीव्र केला आहे.

    तेजस आपल्या कुटुंबासह रिंगणगावात राहत होता. त्याचे वडील गजानन महाजन शेतीसह कृषी केंद्र चालवतात. सोमवारी (१६ जून) गजानन यांनी तेजसला दुकानावर ठेवून जळगावला कामासाठी गेले होते. संध्याकाळी दुकान बंद करून तेजस घरी येईल, अशी अपेक्षा होती; परंतु तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी रात्रभर शोध घेतला. याबाबत एरंडोल पोलिसांत तक्रार दाखल झाली.

    मंगळवारी पहाटे खर्ची गावाजवळील निंबाळकरांच्या शेतात तेजसचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवताच, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी तपास केला. मृतदेह तेजसचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे या हत्येमागे अंधश्रद्धेतून नरबळीचा संशय पोलिसांना आहे. तिघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हत्या कोणत्या कारणाने आणि कोणाच्या सांगण्यावरून झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    २ खासदारांपासून ३०३ पर्यंतचा प्रवास; कार्यकर्त्यांच्या बळावर उभा भाजप – आ. सुरेश भोळे

    April 6, 2026

    बारामतीत बिनविरोधची अपेक्षा, पण लढत अटळ; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

    April 6, 2026

    नांदेड हादरले : शिवसेना पदाधिकाऱ्याची भररस्त्यात तलवारीने हत्या; तीन दिवसांत पाच खून !

    April 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.