Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या
    क्राईम

    धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 20, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । शहरातील मारोती पेठ येथील १८ वर्षी तरूणाने रात्री धावत्या रेल्वे समोर येवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसनजीत प्राणकीशन कबीराज (वय-१८) रा. बलीदेवांगंज जि. हुगली, पश्चिम बंगाल, ह.मु. मारोती पेठ, जळगाव हा गेल्या दीड महिन्यांपासून सोने कारागिर म्हणून काम करण्यासाठी जळगावात आला होता. मलाईकर यांच्याकडे तो सोन्याची दागिने तयार करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होता. सोमवारी १८ एप्रिल रोजी दिवसभर काम केल्यानंतर रात्री १० वाजता तो आपल्या सहकार्‍यांना मी बाहेरुन नाश्ता करुन येतो असे सांगून दुकानातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने आसोदा रेल्वे गेटजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२० ते ४२२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. स्टेशन मास्तर एम. अग्रवाल यांनी या घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे व सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. मयताची अंगाची झडती घेतली असता, त्याच्याकडे मोबाईल व आधाराकार्ड आढळून आले. त्यावरुन त्याची ओळख पटली. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्जांना गर्दी

    December 23, 2025

    चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात; भरधाव कारची मालवाहू वाहनाला धडक, दोघे गंभीर

    December 23, 2025

    गाईला गाडीच्या डिक्कीत कोंबून नेले चोरुन !

    December 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.