Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
    राजकारण

    भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

    editor deskBy editor deskJune 15, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    भारतील जनता पक्षाला मुंबईत आणखी मदतीची गरज आहे, असे दिसून येत आहे. म्हणून ते इतर पक्षांसोबत संपर्क साधत असून हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

    जयंत पाटील म्हणाले की, रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली असे म्हणता येणार नाही. आम्ही संपूर्ण इाकरे कुटुंबियांना जवळून पाहिजे आहे, आम्हाला असे काही वाटत नाही. आगामी निवडणूक आम्ही आमच्या विचाराच्या मविआतील पक्षासोबत लढवू असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

    जयंत पाटील म्हणाले की, मुंबई पालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या .या ठेवी आता रिकाम्या होऊ लागल्या आहेत .2 लाख 36 कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत मात्र यांच्याकडे द्यायला पैसा नाही .असलेल्या ठेवी मोडण्याची वेळ यांच्यावर आली आहे असे म्हणत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

    जयंत पाटील म्हणाले की, आपल्या समोर मोठी आव्हान आहेत. पक्षाची दोन शकले झाली मात्र मुंबईचे कार्यकर्ते कुठे गेले नाहीत 2-4 टक्के माणसं फक्त इकडे तिकडे गेली. लोकसभा झाल्यानंतर लोकं आमच्याकडे इकडे यायला लागली. फुटपाथवर सुद्धा प्रवेश करू लागली. गाड्या थांबवून प्रवेश घेऊ लागले. म्हणाले साहेबांना भेटून आलोय आम्हाला प्रवेश द्या. आम्ही सुद्धा त्यांना बुके दिला. काही दिवसांत विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यानंतर ते दिसायचे बंद झाले. तुम्ही समोरच्याना घाबरू नका ते फक्त बॅनरवर असतात. कुणाचा फोटो असणार हे देखील फिक्स आहे. समोरच्या भपकेगिरीला घाबरू नका. अद्याप आघाडीची एकत्रित लढायचं की वेगळं लढायचं याबाबत चर्चा झाली नाही. लवकरच त्याबाबत निर्णय होईल.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.