जळगाव : प्रतिनिधी
घराशेजारी राहणाऱ्याच्य दुचाकीजवळ तीन वर्षीय बालक खेळत असल्याच्या तरुणाने बालकाला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन चौघांनी बालकाच्या वडीलांसह काका व आजोबांना बेदम मारहाण केली. तेथे पडलेला विटेचा तुकडा त्यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. ही घटना दि. १३ रोजी सायंकाळी उस्मानिया पार्क परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानिया पार्क परिसरात मोहम्मद सलीम मोहम्द नजीर शेख (वय ५८) हे वास्तव्यास आहे. दि. १३ रोजी ते घरी असतांना त्यांचा नातू हा घरासमोर खेळत होता यावेळी तो गल्लीत राहणाऱ्या जाकीर कुरेशी यांच्या गाडीजवळ खेळत असल्याचा राग आल्याने तो जोरजोरात शिवीगाळ करु लागला. यावेळी मोहम्मद सलीम यांनी त्यांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने जाकीर कुरेशी याने तौसिफ जमली कुरेशी, फज्जू कुरेशी, नासीर कुरेशी यांना बोलावून घेतले. त्यांनी तिघांना मारहाण केली. तर तौसिफ कुरेशी याने बांधकामाच्या ठिकाणी पडलेली वीट उचलून मोहम्मद सलीम मोहम्मद नजीर यांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार दिली. असून त्यानुसार तौसिफ जमील कुरेशी, फज्जू कुरेशी, नासीर कुरेशी, जाकीर कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.