• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ग्राहकांना बसणार मोठा फटका : सोन्याचे दर पुन्हा भिडले गगनाला !

editor desk by editor desk
June 13, 2025
in lifestyle, राज्य, राष्ट्रीय
0
ग्राहकांना बसणार मोठा फटका : सोन्याचे दर पुन्हा भिडले गगनाला !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून सोन्याच्या दरात कमी अधिक होत असतांना आता पुन्हा एकदा सोने १ लाख पार झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) शुक्रवारी सोन्याच्या वायदे दरात २ टक्के म्हणजेच २ हजारांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर १ लाख ४०० रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा दर ८०० रुपयांनी वाढून प्रति किलो १ लाख ६ हजारांवर गेला. एमसीएक्सवरील सोने दराचा हा सर्वकालीन उच्चांक मानला जात आहे.

इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ला केला. यात इराणच्या अण्विक तळांचा समावेश आहे. यात इराणचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलने या कारवाईला ‘रायझिंग लायन’ असे नाव दिले आहे. असे मानले जाते की इराण या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल.

सोने का महागले?

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आणि कमकुवत डॉलर निर्देशांकामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्यावेळी जगात भू- राजकीय तणाव वाढतो, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून गुंतवणूकदार सोने खरेदीकडे वळतात. परिणामी सोन्याच्या दरात वाढ होते.

गुरुवारी सोन्याचा दर १.७ टक्के वाढून प्रति १० ग्रॅम ९८,३९२ रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीचा दर ०.४ टक्के वाढून प्रति किलो १,०५,८८५ रुपयांवर बंद झाला होता. या आठवड्यात सोने दरात ३.५ टक्के वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही स्पॉट गोल्डचा दर १.३ टक्के वाढून प्रति औंस ३,४२८ डॉलवर पोहोचला आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९९,१७० रुपयांवर खुला झाला. तर २२ कॅरेट ९०,८४० रुपये, १८ कॅरेट ७४,३७८ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ५८,०१४ रुपयांवर खुला झाला आहे. चांदीचा दर प्रति किलो १,०६,२४० रुपयांवर खुला झाला आहे.

 

Previous Post

एमआयडीसीत काम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाने आयुष्य संपविले !

Next Post

मुख्यमंत्र्यांची भेट : ठाकरे बंधू एकत्र येणार ? कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल !

Next Post
मुख्यमंत्र्यांची भेट : ठाकरे बंधू एकत्र येणार ? कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल !

मुख्यमंत्र्यांची भेट : ठाकरे बंधू एकत्र येणार ? कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

या राशीतील लोकांनी कोर्ट केसेसमध्ये सावधगिरी बाळगा !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group