फैजपूर : प्रतिनिधी
हॉटेलमधील बिलावरून झालेल्या भांडणात जातिवाचक शिवीगाळ का केली, याचा फोनवरून जाब विचारल्याचा राग आल्याने हॉटेल व्यवस्थापक आणि त्याच्या दोन मित्रांना चार जणांनी बेदम मारहाण करत, गावठी कट्टा फिर्यादीवर रोखून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची ही घटना दि १० रोजी रात्री ११:४५ मिनिटांनी सुभाष चौकात घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेप्रकरणी शेख आरिफ शेख कलीम, शाहरुख शेख, आसिफ शेख, आकीब शेख या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे व्यवस्थापक सुमित उर्फ छोटू मार्तंड साळुंके रा. फैजपूर याला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली होती सुमित साळुंके याने फोनवरून जाब विचारला होता, याचा राग मनात धरून सुमित साळुंके आणि त्याचे मित्र अमोल तायडे, सागर भालेराव यांना मंगळवारी रात्री आरोपींनी मारहाण केली. शेख आरिफ, शाहरुख शेख, आसिफ शेख या तिघांना अटक करण्यात आली आहे, तर आकिब शेख फरार झाला आहे.