Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बेघर निवारा केंद्रातील महिलेची फसवणूक ; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल !
    क्राईम

    बेघर निवारा केंद्रातील महिलेची फसवणूक ; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल !

    editor deskBy editor deskJune 12, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    उपचार करण्यासाठी घेऊन जाते असे सांगून एक अज्ञात महिला ही ज्योतीबाई भगवान बाविस्कर (४७, रा. संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र, जळगाव) या महिलेचे दागिने व मोबाइल घेऊन पसार झाली. हा प्रकार ७ जून रोजी घडला. या प्रकरणी १० जून रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवीन बसस्टँडसमोरील मंदिराजवळ अज्ञात महिला ज्योतीबाई यांना भेटली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात महिलेने ज्योतीबाई यांना साकेगाव शिवारातील खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्याजवळील दागिने, मोबाइल घेऊन पसार झाली. ज्योतीबाई भुसावळ येथे पोलिस ठाण्यात गेल्या असता तिला नशिराबाद पोलिस ठाण्यात जाण्याविषयी सल्ला देऊन त्यांना रिक्षात बसवून देण्यात आले. भुसावळ पोलिसांनी रिक्षात बसविल्यानंतर काहीच समजत नसल्याने ही महिला नशिराबादला न उतरता थेट जळगावला आली. बेघर निवारा केंद्रात त्यांनी ही हकीकत सांगितली. दागिने घेऊन गेलेली महिला परत येईल, या आशेवर प्रतीक्षा करूनही ती न आल्याने ज्योतीबाईने जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों वंदना चव्हाण करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.