जळगाव : प्रतिनिधी
पोलिस ठाण्यात तक्रार का केली, या कारणावरून वाद होऊन एकमेकांना शिवीगाळ करीत सळईने मारहाण करण्यासह कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना १० जून रोजी पिंप्राळा हुडको परिसरात घडली. परस्परविरोधी तक्रारीवरून एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी किरण अर्जुन सोये ( वय३१) यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पिंप्राळा हुडको परिसरातील चार जणांनी त्यांना मारहाण करत जखमी केले. दुसऱ्या गटातील बेबाबाई अभिमान भालेराव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली म्हणत त्यांना चौघांनी मारहाण करून कोयत्याने वार केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.