Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भामट्याने कमालच केली : मुख्यमंत्र्यांची बनावट सही करून दिले जॉइनिंग लेटर !
    क्राईम

    भामट्याने कमालच केली : मुख्यमंत्र्यांची बनावट सही करून दिले जॉइनिंग लेटर !

    editor deskBy editor deskJune 11, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बनावट सहीचे जॉइनिंग लेटर देऊन मंत्रालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत चाळीसगावमधील एका तरुणीची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील तरुणीला मुंबई येथील मंत्रालयात क्लार्क पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. तिच्याकडे देण्यात आलेले जॉइनिंग लेटर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेटरपॅडवर आणि बनावट सहीसह तयार करण्यात आले होते. त्यामुळे ते खरे असल्याचा भास झाला. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाच्या नियमानुसार अशा लेटरवर संबंधित विभागप्रमुख अथवा सचिवांची सही असते, हे लक्षात आल्यावर तरुणीने संशय व्यक्त केला.

    याप्रकरणी मुख्य आरोपी सर्वेश प्रमोद भोसले याच्याकडे चौकशी केली असता त्याने खळबळजनक कबुली दिली. त्याने इंटरनेटवर “cm officer letter Maharashtra” असे सर्च करून मिळालेल्या नमुन्यावरून खडकी येथील स्वामी ग्राफिक्सवर रणजीत मांडोळे यांच्या मदतीने बनावट मजकूर तयार केला आणि त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची नक्कल सही टाकून जॉइनिंग लेटर तयार केल्याचे उघड झाले.

    तपासात आणखी एक आरोपी तुषार उर्फ रोहित मधुकर बेलदार याचा देखील सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांविरुद्ध चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत. या बनावट दस्तऐवज प्रकरणामुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली असून, अशाप्रकारे आणखी किती लोकांची फसवणूक झाली आहे, याची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, शहरात मोठ्या फसवणूक रॅकेटचा संशय व्यक्त केला जात असून, या संदर्भात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.