Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विहिरीचे पाणी भरण्यावरून वाद : सहा जणांनी केली जबर मारहाण !
    क्राईम

    विहिरीचे पाणी भरण्यावरून वाद : सहा जणांनी केली जबर मारहाण !

    editor deskBy editor deskJune 11, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील वावडे येथे विहिरीचे पाणी भरण्यावरून वाद होऊन सहा जणांनी मारहाण केल्याने हात मोडल्याची घटना ७ रोजी घडली.

    सविस्तर वृत्त असे कि, वावडे येथील नरेंद्र भीमराव वानखेडे (३०) हा ७ जून रोजी शेतात कपाशीला पाणी देत असताना बाजूच्या शेतात काम करणारे त्याचे काका शिवाजी विठ्ठल पाटील यांनी मोटरचा फ्यूज काढून घेतला. नरेंद्र याने याबाबत विचारले असता त्याचा राग आल्याने दोघात बाचाबाची झाली. त्यामुळे बाजूच्या शेतात काम करणाऱ्या फिर्यादीच्या काकू सुलाबाई शिवाजी पाटील, दुसरे काका गुलाब विठ्ठल पाटील, चुलत भाऊ ज्ञानेश्वर गुलाब पाटील, त्याची पत्नी आशाबाई ज्ञानेश्वर पाटील, पुतण्या प्रतीक ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी येऊन नरेंद्र याची सुटका केली.  या मारहाणीत त्याला जबर दुखापत होऊन त्याचा उजवा हात फॅक्चर झाला आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याने सहा जणांविरुद्ध मारवड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.