जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील तुरखेडा येथील 74 वर्षीय शेतकरी रमेश उत्तम धीवर यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (९ जून) तुरखेडा शिवारात घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रमेश धीवर यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले होते. मात्र हवे तसे उत्पन्न येत नसल्याने त्यांच्यावर कर्ज वाढत गेले. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते असायचे. त्यात त्यांनी सोमवारी शेतात गळफास घेतला. हा प्रकार त्यांच्या मुलाच्या लक्षात आला. त्यावेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ. प्रकाश चिंचोरे करीत आहेत.


