जळगाव : प्रतिनिधी
लग्नात मानपान न दिल्याच्या कारणावरून आणि पतीच्या व्यवसायासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी करत जळगावचे माहेर असलेल्या विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात महिलेच्या पतीसह सासरच्या ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नेहरू नगर परिसरातील सपना सुदर्शन पाटील (वय ३९) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील पाथरी येथील सुदर्शन रवींद्रसिंग पाटील यांच्याशी झाला आहे. सपना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सासरच्या मंडळींनी लग्नात मानपान न दिल्यावरून शिवीगाळ केली. याशिवाय सपना पाटील यांना शासकीय नोकरीतून येणाऱ्या पूर्ण पगाराची मागणी करत आणि पतीच्या व्यवसायासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्यासाठी छळ केला. ही मागणी पूर्ण न केल्याने तिला घरातून हाकलून देण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात पती सुदर्शन पाटीलसह सासरच्या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


