Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
    क्राईम

    धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

    editor deskBy editor deskJune 9, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मुंबईहून लखनऊकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधून तब्बल आठ ते बारा प्रवासी पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. सोमवार (९ जून) सकाळी घडली आहे. सहा जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

    ANI ने दिलेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. शाळा-महाविद्यालये आणि कार्यालयांना जाणाऱ्या प्रवाशांनी लोकलमध्ये प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीत काही प्रवासी दरवाजावर उभे होते. गर्दी आणि धक्काबुक्कीमुळे संतुलन बिघडून तब्बल आठ ते बारा प्रवासी खाली पडले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार यातील सहा जणांचा मृत्यू झाला असून, ट्रेनमधील अत्याधिक गर्दीमुळे दरवाजावर लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले.

    रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. तसेच प्रवासी संघटनांकडून अतिरिक्त गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील लोकल ट्रेनचा प्रवास हा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवासी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लोकलच्या वेळा, डब्यांची संख्या वाढवून आणि दरवाजांजवळ सुरक्षा व्यवस्था ठेवल्यास असे अपघात टाळता येऊ शकतात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.