मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील थेरोळा शेत शिवारात गावठी हातभट्टी दारूवर मुक्ताईनगर पोलीसांनी धाड टाकून १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी एकावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा शेत शिवारात बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू तयार होत असल्याची गोपनिय माहिती नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना मंगळवारी १२ एप्रिल रोजी मिळाली. त्यानुसार स्वत: मैदानात उतरून शेळके यांनी पथकासह आज सकाळी ६.३० वाजता छापा टाकून दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. यात एकुण १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि प्रदीप शेवाळे, राहूल बोरकर, पोहेकॉा गणेश मनुरे, पोना धर्मेंद्र ठाकूर, लतीफ तडवी, प्रदीप इंगळे, पोकॉ.रवींद्र धनगर, संभाजी बीजगरे, सागर सावे, गोपीचंद सोनवणे, राहुल नावकर यांनी केली.