Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
    क्राईम

    जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

    editor deskBy editor deskJune 9, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    महापालिकेच्या कचरा संकलनाच्या वाहनामध्ये प्राण्यांचे संशयास्पद अवशेष आढळून आल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बाब हिंदुत्ववादी संघटनांना समजताच पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले होते व यामुळे तालुका पोलिस ठाणे परिसरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री या प्रकरणी अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, रविवारी सकाळी महापालिकेचे कचरा संकलित करणारे वाहन (एमएच १९, एम ९३८९) मास्टर कॉलनीत कचरा संकलित करीत असताना त्यात प्राण्यांचे आक्षेपार्ह अवशेष टाकण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास हे वाहन कचरा डेपो येथे कचरा खाली करीत असताना त्या ठिकाणी दुसरे वाहनदेखील (एमएच १९, एम ९३८५) आले. दोन वाहनांमध्ये चालकांना कोणीतरी आक्षेपार्ह प्राण्यांचे अवशेष टाकल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती तालुका पोलिसांना दिली.  अवशेषांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येऊन नमुने घेण्यात आले आहेत. घटना कळताच हिंदुत्ववादी संघटनांनी तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

    दुपारी संशयास्पद अवशेष आढळून आल्यानंतर रात्री पुन्हा वेगवेगळ्या प्राणी, पक्षांचे अवशेष असणारे वाहन कचरा डेपो परिसरात आले. त्यावेळी चंदू अण्णा नगर परिसरातील रहिवाशांनी हे वाहन थेट महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील यांच्या घरासमोर लावले. मात्र अधिकारी घराबाहेर आले नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.