भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील एका २१ वर्षीय तरुणीची तिघांनी छेडछाड करीत मारहाण आणि लूटमार केल्याची गंभीर घटना ७ जून रोजी संध्याकाळी घडली. या तरुणीच्या घरी शोलू (पूर्ण नाव माहीत नाही), आसिफ बेग ऊर्फ बाबा काल्या आणि सादिक इबाबत हे आले. तिघांनी शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. शोलू याने तिचे केस ओढले, तर बाबा काल्या याने मारहाण केली. सादिक इबाबत याने चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली.
यावेळी तिच्या खिशातील चार ते पाच हजार रुपये काढून नेल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. ही घटना घडत असताना मरियम नाजिर, हिसा नौशिर आणि फातेमा हिसा यांनी पीडितेलाआरोपींच्या तावडीतून सोडविले. बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.