धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथून जवळच असलेल्या वराड गावात तलवार घेऊन फिरणाऱ्या अन् दहशत माजवणाऱ्या २५ वर्षीय तरुणास पाळधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, येथून जवळच असलेल्या वराड गावात एक तरुण हातात तलवार घेऊन फिरत असून दहशत निर्माण करत असल्याची माहिती पाळधी पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर तत्काळ पाळधी पोलिसांनी तेथे धाव घेतली. या वेळी तेथे राहुल आधार येशराय (वय २५, रा. वराड) हा तरुण हातात तलवार घेऊन फिरत असताना आढळून आला. त्याला पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेऊन पाळधी पोलीस चौकीत आणले. त्या
नंतर त्याच्यावर विविध कलमांनुसार कारवाई करून त्याला अटक केली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, धरणगावचे पो.नि. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनात पाळधीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे, योगेश सोनवणे, महेंद्र पाटील, विठ्ठल पाटील, संदिप खंडारे, भरत पाटील, रवींद्र इंगळे, ज्ञानेश्वर सोनवणे, ज्ञानेश्वर बाविस्कर यांच्या पथकाने केली. तपास जितेश नाईक करत आहेत.