एरंडोल : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून आली. याबाबत एरंडोल पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर येथील पथकाने एका दुचाकीस्वारास अटक केली आहे. १९ मे रोजी एरंडोल तालुक्यातील कढोली येथील किशोर सुरेश बडगुजर (३६) यांची दुचाकी (एमएच१९/सीएन१७७२) ही चोरीस गेल्याची फिर्याद त्यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला दिली होती. पोलिसांनी पारोळा तालुक्यातील टिटवी येथील संशयित दिलीप पाटील यास भडगाव तालुक्यातील बांबरुड (महादेवाचे) येथून ताब्यात घेतले आहे.
दरम्यान शहर व तालुक्यातील अनेक ठिकाणी दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून आरोपीकडून अजून काही दुचाकी चोरीच्या उलगडा होईल, असे पोलिस सुत्रांनी सांगितले. तपास पोनि निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ महेंद्रसिंग पाटील, पोना दत्तात्रय ठाकरे करीत आहेत. दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी विविध ठिकाणी फिल्डींग लावली होती. त्यातच संशयित दिलीप पाटील याच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानेच ही दुचाकी चोरल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी त्याला बांबरूड महादेवाचे येथून ताब्यात घेतले आहे.