Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळके येथील विकासो निवडणुकीचे बिगुल वाजले
    जळगाव

    जळके येथील विकासो निवडणुकीचे बिगुल वाजले

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रविण पाटील । तालुक्यातील जळके येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षीक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

    जळगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यात नामनिर्देशनपत्र विक्री व दाखल करण्याची तारीख १३ एप्रिल २०२२ ते २१ एप्रिल २०२२ पर्यंत सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत तसेच प्राप्त झालेले नामनिर्देशनपत्र प्रत्येक दिवशी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येतील. प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी २२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजता उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव निवडणूक कार्यालय येथे होईल. त्यानंतर नामनिर्देशनपत्रांची यादी २५ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाईल.

    नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख २५ एप्रिल २०२२ ते ९ हे २०२२ पर्यंत सकाळी ११ वाजेपासून तर दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक कार्यालय जळगाव या ठिकाणी आहे. तसेच सर्व पात्र उमेदवारांना चिन्ह वाटप व अंतिम विधी प्राय नामनिर्देशनपत्रांची यादी १० मे २०२२ रोजी ११ वाजता निवडणूक कार्यालय जळगाव येथे प्रसिद्ध करण्यात येईल. जळके विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे मतदान २२ मे २०२२ रोजी सकाळी ८ वाजेपासुन दुपारी ४ वाजेपर्यंत घेण्यात येईल. मतदान संपल्यानंतर लगेच मतदान केंद्रावर मतमोजणी होऊन निकालाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून प्राप्त झाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    बारामती-राहुरीत राजकीय हालचालींना वेग; पोटनिवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

    March 15, 2026

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.