• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत चार दुकाने फोडली !

editor desk by editor desk
June 7, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

भुसावळ : प्रतिनिधी

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी चार दुकानांचे शटर फोडून रोकड व इतर साहित्य चोरून नेले. तर दोन दुकानांच्या बाहेरून एसीच्या तांब्याच्या नळ्याही कापून नेल्या. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी स्वराज्य पान सेंटर, टीडीसी कुरिअर कॅमेरा या चार ठिकाणच्या शटरचे कुलूपे तोडली. तर सोहम डिजिटल कलर लॅब व आर. पी. इंटरप्रायझेस या दोन दुकानांच्या एसीच्या तांब्याच्या नळ्या बाहेरच्या बाहेर कापून नेल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, काही ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले आहेत हे व्यापारी संकुल बाजारपेठ पोलिस ठाण्यालगत असतानाही चार दुकाने फोडली गेली. ही गंभीर बाब व्यापारी संघटनांनी उपस्थित केली आहे. दोन चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले असून, रेल्वे स्थानक परिसरात व्हाइटनर सारखी नशा करताना आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोहम डिजिटल व आरपी इंटरप्रायझेस या दोन्ही दुकानांची वातानुकूलित यंत्रणेतील तांब्याच्या पाइपलाइन कापून नेण्यात आल्या. तसेच व्यापारी संकुलात इतर काही दुकानांसमोरील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्यात आले.

तळमजल्यावरील स्वराज्य पान सेंटर दुकानाचे दोन्ही शटर तोडून ४ ते ४.५ हजारांची रोकड, सिगारेट पाकिटे व इतर वस्तू चोरट्यांनी चोरल्या. शुक्रवारी सकाळी ९ वाजता नगरपालिका सफाई कर्मचारी रवी सिंगोतिया यास दुकानांचे शटरचे तुटलेले कुलूप दिसताच त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी सपोनि गणेश धुमाळ, राजू सांगळे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी पाठवले. या घटनेतील चोरटे यापूर्वीही शहरात अनेक चोरीच्या घटनांमध्ये सामील असल्याचे आढळले आहे. त्यांचा शोध सुरू आहे. लवकरच अटक करून कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिले. संकुलात रात्री पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी पुढे येत आहे.

Previous Post

चार दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !

Next Post

शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !

Next Post
शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !

शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्री पद काढण्याच्या हालचालीला वेग ?
कृषी

माणिकराव कोकाटेंचे कृषिमंत्री पद काढण्याच्या हालचालीला वेग ?

July 24, 2025
भरधाव एसटी बसची शाळकरी विद्यार्थ्याला जबर धडक !
क्राईम

भरधाव एसटी बसची शाळकरी विद्यार्थ्याला जबर धडक !

July 24, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास !

July 24, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

वॉचमनसह दोघांना दारूच्या नशेत आलेल्या इसमाने केली जबर मारहाण !

July 24, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

२ हजारांची लाच स्वीकारताना अधिकारी अटकेत ; जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ !

July 24, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

तुम्ही तुमच्या कामासाठी कोणावरही अवलंबून राहू नये.

July 24, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp