Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हृदयद्रावक : आईसह गावी येताना तरुणाचा रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    हृदयद्रावक : आईसह गावी येताना तरुणाचा रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskJune 7, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    रावेर तालुक्यातील निंभोरा येथील ३३ वर्षीय तरुणाला नाशिक येथे नोकरी मिळाल्यानंतर आईसह गावी परतत असताना आनंदा अशोक रजाने या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. रेल्वेत आई त्याची वाट पाहत राहिली… पण काही वेळातच मुलाचा मृतदेहच तिच्या नजरेस पडला! ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी, ६ जून रोजी सकाळी आसोदा शिवारात घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, निंभोरा येथील आनंदा रजाने हा तरुण नाशिक येथे मामाकडे आईसह कामाच्या शोधात गेला होता. तेथे एका कंपनीत त्याला नोकरी मिळाली. अवघ्या आठवडाभराच्या कामानंतर तो शुक्रवारी सकाळी आईसह गावी परतण्यासाठी रेल्वेने भुसावळ मार्गे निघाला. मात्र प्रवासातच, आसोदा शिवाराजवळ भुसावळ स्थानकावर उतरल्यावर तिने घटना रेल्वे अधिकाऱ्यांना कळवली. तिची व्यवस्था जळगावला परत करण्यात आली आणि येथे आल्यानंतर तिने रेल्वे सुरक्षा बलाला घटनेची माहिती दिली. शोध घेतल्यानंतर आनंदाचा मतदेह सापडला.

    आनंदा व त्याची आई हे भुसावळपर्यंत रेल्वेने प्रवास करत होते. त्याआधीच जळगाव रेल्वे स्थानक आले होते. आनंदाने आईला उतरावं का विचारलं, मात्र आईने सांगितलं की, “हे जळगाव आहे, आपल्याला पुढे भुसावळला जायचंय.” काही क्षणातच आनंदा अचानकपणे खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.  आनंदा रजाने हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे दोन विवाहित बहिणी आहेत. अवघ्या आठवडाभराची नोकरी, त्यानंतर गावी परतताना झालेला दुर्दैवी मृत्यू आणि आईच्या डोळ्यांसमोर घडलेली ही घटना संपूर्ण गावात हळहळ निर्माण करणारी ठरली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.