Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावसह जिल्ह्यातील इतर व्यापाऱ्यांची ६० लाखात फसवणूक; दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल
    क्राईम

    जळगावसह जिल्ह्यातील इतर व्यापाऱ्यांची ६० लाखात फसवणूक; दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 12, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना ६० लाखांमध्ये फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अधिक माहिती अशी की, महेंद्र सतिषचंद्र ललवाणी रा. डेमला कॉलनी जळगाव यांचे जी. एस. ग्राऊंडजवळ समर एजन्सीज नावाचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे दुकान आहे. दरम्यान निलेश शांताराम पाटील व दिनेश पाटील या दोघांनी सन २०१३ मध्ये श्री इलेक्ट्रॉनिक्स शॉपी नावाने नाथप्लाझा येथे दुकान सुरु केले होते. हे दोघ ललवाणी यांच्याकडून होलसेल भावात इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेवून जात होते. त्यांनी ३१ जुलै २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेवून रोख व उधारीने घेवून जात होते.

    काही वेळा रोख तर काही वेळा उधारीने वस्तू घेवून जात असल्याने त्यांनी ललवाणी यांचा विश्‍वास संपादन केला. दरम्यान त्यांच्याकडे सुमारे ११ लाख ८६ हजार ७३ रुपये बाकी आहेत. त्यांना बाकी असलेल्या पैशांसाठी फोन करुन व त्यांच्या घरी जावून मागणी केली असता, त्यांच्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती.

    महेंद्र ललवाणी यांनी निलेश व दिनेश पाटील या दोघांबद्दल मार्केटमध्ये विचारपूस केली असता ललवाणी यांच्यासह अनेक व्यापार्‍यांना दोघांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. भुसावळ, धुळे , पुणे आणि जळगावातील काही व्यापाऱ्यांना एकुण ६० लाख २२ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी महेंद्र ललवाणी यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहरपोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.