पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील विचेखडेजवळ कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ४ रोजी घडली घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विचखेडेजवळ दि. ४ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास विजय अंभोरे (२४), नितीन पगारे (२४), रामा कौतिक कंडारे (१८, पारोळा) हे दुचाकीने वसनगर येथे धार्मिक कार्यक्रमासाठी जात असताना गाडी नादुरुस्त झाली होती. ही गाडी लोटून आणत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (एमएच०१/एएक्स ९९१६) जोरदार धडक दिली. त्यात तिघेही गंभीररित्या जखमी झाले. दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तिघांनाही तात्काळ रुग्णवाहिकेतून चालक आशुतोष शेलार यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता विजय अंभोरे याचा वाटेतच मृत्यू झाला. इतर दोघांना पुढील उपचारार्थ धुळे येथे हलविण्यात आले आहे. याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



