Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार; संशयिताला अटक
    क्राईम

    लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर अत्याचार; संशयिताला अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रApril 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवित नागपूरातील तरुणीवर तब्बल सात महिने वेळावेळी शारिरीक अत्याचार केल्याची घटना समोर आली असून अत्याचार करणाऱ्या संशयिताला पोलीसांनी अटक केली आहे.

    याबाबत माहिती अशी की, पिडीत तरुणी ही नागपूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. २०२१ मध्ये तीची इन्स्टाग्रामवर जळगावातील गेंदालाल मिल येथील दानिश खान मुबारक खान (वय-१९) रा. गेंदालाल मिल, जळगाव याच्यासोबत ओळखी झाले. या ओळखीचे रुपांतर प्रेमात होवून दोघांचे मोबाईलवर बोलणे सुरु झाले. यादरम्यान तरुणीचे तिच्या समाजाच्या तरुणासोबत लग्न ठरले. यादरम्यान दानिश याने तरुणीला फोन करुन मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्याशी लग्न करेन असे सांगितले. तसेच लग्नाचे आमिष दाखवित दानिश याने वेळावेळी नागपूरातील लॉज, तसेच जळगावात तरुणीवर शारिरीक अत्याचार केले. ४ एप्रिल रोजी तरुणी जळगावात आली. दानिशच्या कुटुंबियांना भेटली ७ एप्रिल पर्यंत ती जळगावात राहिली. त्यानंतर दानिशच्या मित्रांनी तिला एकटेच मलकापूर येथे एकटेच सोडले. तरुणी कशीतरी नागपूरातील तिच्या मावशीकडे पोहचली. यादरम्यान तरुणीने दानिशला फोन केले. व घ्यायला यायला सांगितले. मात्र त्याने येण्यास नकार देत, उलट तरुणीला जळगावात बोलाविले.

    तरुणी एकटीच जळगावात आली. यादरम्यान दानिशने त्याचा फोन बंद करुन ठेवला. समाजसेविकेच्या माध्यमातून तरुणी फसवणूक झाल्याने तक्रारीसाठी शहर पोलीस ठाण्यात पोहचली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तरूणाला अटक करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    ब्रेकिंग न्यूज | धुळे जिल्हा हादरला! हळदीच्या दिवशीच रक्तस्नान; पिंपळनेरमध्ये तिहेरी हत्याकांड

    February 19, 2026

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.