जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरसोली प्र.बो येथे घरासमोर लावलेल्या कारवर सिमेंट उडण्याच्या कारणावरून हेमंत साहेबराव खलसे (वय २२) यांच्यासह त्यांच्या घरातील चार जणांना चौघांनी कोयता, फायटरने मारहाण केली. ही घटना ४ जून रोजी शिरसोली येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे हेमंत खलसे यांच्या शेजारी घराच्या अंगणात कार उभी होती. त्यावर सिमेंट उडाल्याने वाद झाला. त्यातून चार जणांनी हेमंत यांच्यासह त्यांचे काका भगवान खलसे यांना कोयत्यासारख्या शस्त्राने व फायटरने मारहाण करीत गंभीर जखमी केले. तसेच भाऊ किरण खलसे व आई मंगलाबाई खलसे यांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी हेमंत खलसे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन पाटील करीत आहेत.



