अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील रहिवासी तसेच आश्रम शाळेतील सातव्या वर्गातील एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना ४ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावातील १४ वर्ष पाच महिने वयाची मुलगी आश्रम शाळेत सातव्या वर्गात शिकत होती. शाळेला सुट्या लागल्यानंतर ती आपल्या मोठ्या बहिणीच्या गावाकडे ये-जा करत होती. दरम्यान. ३ रोजी ही मलगी तिच्या आई वडीलांसह तिच्या घरीच झोपली होती. तर ४ रोजी पहाटे नळाला पाणी येणार म्हणून तिचे आई, वडील पहाटे ३ वाजता उठले असता त्यांना मुलगी दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. तर तिच्या बहिणीकडे ही विचारले, मात्र मुलगी तेथेही नव्हती. तर तिला फुस लावून पळवून नेल्याची खात्री झाली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मारवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. सनील पाटील करत आहेत.


