रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पाल येथील गारबर्डी जवळ बोरघाटात मजुरांनी भरलेली मिनी ट्रक उलटल्याची दुर्घटना बुधवार, ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. या अपघातात अनिल बारेला (२०) याचा मृत्यू झाला तर २१ मजूर जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, मध्यप्रदेशातील मलगात कोठा (खरगोन) येथील रहिवासी मजूर असून मजुरीचे काम आपटून घरी परत जात असताना गारबर्डी जवळ चालकाचे नियंत्रण सुटून वाहन उलटले. घटनास्थळावरून मिनी ट्रकमधून जखमींना पाल ग्रामीण रुग्णालयात आणले. या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पाल परिसरात १०८ रुग्णवाहिका नसल्याने या २२ जखमींना उपचारासाठी खूप हाल झाले. ३ तासांपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. दरम्यान, एका ट्रकमधून जखमींना रुग्णालयात हलविले.
भूरीबाई बारेला, लाडकीबाई भिलाला, नूरलीबाई भिलाला, सुमलीबाई बारेला, लक्ष्मी बारेला, शेवजा बारेला, रूपा बारेला, दयाराम बारेला, पार्वती बारेला, सविता बारेला, आशा बारेला, विकास बारेला, हिरा लाल बारेला, सुभान भिलाला, सूरेश भिलाला, विजय बारेला, ममता बारेला, सायजी बारेला, रखजीता बारेला, जितू बारेला, शेंगा बारेला यांचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमी अनिलचा उपचार घेताना मृत्यू झाला.