नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरात सण २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा हाहाकार सुरु झाला होता आता पुन्हा एकदा देशात कोरोना विषाणू पुन्हा एकदा आपले पाय पसरवत आहे. कोविड १९ च्या ताज्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या ४३०२ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर ४४ जणांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमधून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक कोविड रुग्णांची संख्या केरळमध्ये नोंदवली गेली आहे. याठिकाणी १३७३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये ३२४ सक्रिय रुग्ण आहेत. त्याच वेळी, राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचे ४५७ रुग्ण सक्रिय आहेत. याठिकाणी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाचा आकडा २०० च्या पुढे गेला आहे. राज्यात २०१ सक्रिय रुग्ण आहेत आणि २ जणांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये २१६ सक्रिय रुग्ण आहेत. राजस्थानमध्ये ९० सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे ४३२ सक्रिय रुग्ण आहेत. येथे ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडमध्ये २ आणि तेलंगणामध्ये ३ सक्रिय रुग्ण आहेत. पंजाबमध्ये १२ सक्रिय रुग्ण आहेत. येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात २२ सक्रिय रुग्ण आहेत. झारखंडमध्ये अजूनही ९ रुग्ण सक्रिय आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये ६ आणि हिमाचल प्रदेशात एक रुग्ण आहे. अरुणाचल प्रदेशसाठी दिलासादायक बातमी आहे. येथे कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
गुजरातमध्ये कोरोनाचे १०८ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, एका व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने अपडेट दिले आहे. गुजरातमध्ये एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४६१ झाली आहे. राज्यातील २० रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. काही रुग्णांवर घरीही उपचार केले जात आहेत.