• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !

editor desk by editor desk
June 2, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दर कमी अधिक होत असतांना दोन दिवसापासून सोन्याचे दरात मोठी घसरण झाली होती मात्र महिन्याच्या सुरुवातील पुन्हा एकदा सोमवारी दि.२ जून रोजी वाढ झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर आज ८३७ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ९६,१९२ रुपयांवर खुला झाला. याआधी सोन्याचा दर ९५,३५५ रुपयांवर होता. दरम्यान, चांदीच्या दरात किरकोळ घट दिसून आली आहे.

इंडिया बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २४ कॅरेट दर प्रति १० ग्रॅम ९६,१९२ रुपये, २२ कॅरेट ८८,११२ रुपये, १८ कॅरेट ७२,१४४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ५६,२७२ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ९७,३९२ रुपयांवर आहे.

याआधी एप्रिल महिन्यात सोने दराने १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. चांदीनेही मार्च महिन्यात १ लाख ९०० रुपयांवर व्यवहार करत सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

जगातील वाढत्या व्यापार आणि भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. डॉलरमधील घसरणदेखील सोन्याच्या दरवाढीला कारण ठरली आहे.

२४ कॅरेट सोने हे शुद्ध सोने म्हणून ओळखले जाते. या सोन्याला खरेदीसाठी पहिली पसंत दिली जाते. तर २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिन्यांसाठी केला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, सरकारी कर तसेच रुपयाच्या मूल्यातील चढ-उतार आदी कारणांमुळे भारतात सोन्याच्या किमतीत बदल होतो. विशेषतः लग्न सराई आणि सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढते.

 

Previous Post

…त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार ; मंत्री गडकरींनी सुनावले !

Next Post

मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !

Next Post
मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !

मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार ; मुख्यमंत्री फडणवीस  !
राजकारण

राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार ; मुख्यमंत्री फडणवीस !

June 4, 2025
ट्रकच्या भीषण धडकेत चारचाकीचा झाला चक्काचूर : ९ जणांचा जागीच मृत्यू !
क्राईम

ट्रकच्या भीषण धडकेत चारचाकीचा झाला चक्काचूर : ९ जणांचा जागीच मृत्यू !

June 4, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

शिरसोलीत लोखंडी रॉडने एकाला बेदम मारहाण

June 4, 2025
मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली
क्राईम

मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली

June 4, 2025
मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !
क्राईम

मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !

June 4, 2025
ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !
क्राईम

ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !

June 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group