Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव आयशरच्या धडकेत ॲटोतील तीन ठार तर दोन गंभीर !
    क्राईम

    भरधाव आयशरच्या धडकेत ॲटोतील तीन ठार तर दोन गंभीर !

    editor deskBy editor deskJune 2, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड : वृत्तसंस्था

    मेहकर-पंढरपूर या पालखी महामार्गावरील तेलगाव-माजलगाव रस्त्यावर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. त्यात तीनजण जागीच ठार तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातातील जखमींना माजलगाव येथील संजीवणी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ पाठविण्यात आले. मृतांमध्ये पतीपत्नीचा समावेश आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, आयशरने ॲटोला जवळपास ५० ते ६० फुट अंतरापर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी दिंद्रुड पोलीस तात्काळ दाखल झाले.

    सविस्तर वृत्त असे कि, माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव येथील कांही लोक ॲटो क्र.एम एच.२३ एन ०२७३ ने रविवारी अकरा ते साडेअकरा वाजेदरम्यान तेलगावकडुन माजलगावकडे जात होता. सदरील ॲटो नित्रुड जवळील एका पेट्रोल पंपासमोर आला असता समोरून येणाऱ्या आयशर क्र.एम.एच.२३ एम.९२५५ ने ॲटोला जबरदस्त धडक दिली. आयशरने धडक देताच ॲटो जवळपास ५० ते ६० फुट दुर अंतरापर्यंत फरफटत नेले. या भीषण अपघातात ॲटोमधील तीन जण जागीच ठार झाले असुन, मृतात एका महिलेचा समावेश आहे. तर दोन गंभीर जखमी झाले असुन, सर्व जखमी गंभीर आहेत. त्यांना तेलगाव येथील रूग्ण वाहिकेने माजलगाव येथील रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले.

    यात फारूक चांद सय्यद, त्यांच्या पत्नी सय्यद शबाना फारूक व शेख नोहिद एजाज हे तीन जण ठार झाल्याचे समजते. मृताच्या जवळ असलेल्या आधारकार्डवरून त्यांची ओळख झाली. अपघातातील जखमी फरीदा अन्वर पठाण व एक २२ वर्षाचा मुलगा नाव समजले नाही. दरम्‍यान आयशर चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव ढाकणे यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश साळुंखे, खलील मोमीन, सचिन गायकवाड, कानदास बनसोडे, चामनर आदि तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमी २२ वर्षाचा मुलगा माजलगाव येथील संजीवनी या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत झाला आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.