अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात मिस्त्री काम करणाऱ्या तरुणाने अल्पवयीन तरुणीला पळून जाण्याचे सांगत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र हा प्रकार मुलीने आई-वडिलांना सांगितल्याने तरुणाला ग्रामस्थांनी चोप दिला असून तरुणाविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, १ जून रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून एका गावात घराच्या बांधकामांच्या ठिकाणी मिस्त्री काम करणारा समीर अक्रम अली खान (२२, अमळनेर) याने एका मुलीकडून पिण्यास पाणी मागितले. त्यानंतर त्याने घरात घुसून मुलीचा हात पकडला. आपण उद्या पळून जाऊ, असे तिला सांगत त्याचा मोबाइल नंबर दिला. फोन करेल तेव्हा आपण पळून जाऊ, असे सांगत त्याने ही गोष्ट कोणाला सांगितल्यास मुलीला व आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. मुलीने वडिलांना आई-हकीकत सांगितल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्याला चोप दिल्याची माहिती असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देखील याठिकाणी हजेरी लावली होती. आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास पोउनि. विनोद पाटील हे करीत आहेत.