जळगाव : प्रतिनिधी
शहरातील अनेक परिसरात गांजाची विक्री होत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना आता रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील राजीव गांधी नगरात १३ हजारांचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रामानंद नगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी पोनि.राजेंद्र गुंजाळ यांना दि.३० रोजी मिळालेल्या माहितीनुसार एक इसम पोलीस स्टेशन हददीत गांजा हा अमली पदार्थ चोरुन विकत आहे. सदरची बातमी मिळाताच पोनि.राजेंद्र गुंजाळ यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांना सदरची गोपनीय बातमीची माहीती दिली. त्यावर मा. वरीष्ठांनी तात्काळ बातमीची खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
शहरातील राजीव गांधी नगर येथील एका निमुळत्या गल्लीत एक इसम संशयीतरित्या हालचाल करतांना आढळुन आल्याने बातमी ठिकाणी छापा घालणेकामी दोन शासकीय पंचासह सापळा लावला. सदर संशयीताने पोलीस आल्याचे पाहताच पळुन जाण्याचे तयारीत असतांना पोलीस पथकाने त्यास जागेवरच पकडुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने रमेश बाबासाहेब झेंडे वय-५४वर्षे रा.राजीव गांधी नगर जळगाव असे सांगितले. व त्यास विश्वासात घेवुन नियमानुसार त्याचे घराची झडती घेतली असता, त्याचे घरातील एका प्लास्टिकचे पिशवीत हिरवे पाने, बिया काडया असलेला उग्रवासाचा अमली पदार्थ मिळुन आला सदर पदार्थाची फॉरेन्सोक पथकाकडुन तपासणी केली. तपासणीत सदर पदार्थ मानवी बुध्दीवर परीणाम करणार गुंगीकार अमली पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचे वजन केले असता १.३६०० कि.ग्रॅ. एवढे असुन सुमारे १३,६००/- रु किंमतीचा गांजा छाप्यात मिळुन आल्याने मुददेमाल जागेवरच सिलबंद करण्यात आला आहे. करीता सदर आरोपी नामे रमेश बाबासाहेब झेंडे वय-५४वर्षे रा. राजीव गांधी नगर जळगाव यास मुददेमालासह ताब्यात घेवुन रामानंद नगर पोस्टेस CCTNS गुरनं २०७/२०२५ NDPS कायदा १९८५ कलम ८(c)२० (b) ii२२ (B) प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास मा. वरीष्ठांचे व पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील करीत आहेत.
यांनी केली कारवाई !
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी रामानंद नगर पोस्टेचे सपोनि संदीप वाघ, सपोनि.संदीप पाटील, पोउपनि.संजय शेलार पोह.जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, प्रविण भोसले, चापोह प्रमोद पाटील, रेवानंद साळुंखे, मनोज सुरवाडे, अतुल चौधरी, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, उमेश पवार, अजिज शहा, प्रविण सुरवाडे, दिपक वंजारी, अनिल सोननी, आशा गायकवाड, शिला नांगुर्डे अश्या अंमलदारांचे पथकाने कारवाई केली.


