जळगाव : प्रतिनिधी
कामानिमित्त कुटुंबीय बाहेरगावी गेलेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून रोख १० हजार रुपये सोन्याचे दागिने तसेच चांदीचे देवीदेवतांचे शिक्के लांबविले. ही घटना २० ते २४ मे दरम्यान देवीदास कॉलनीत घडली.
सविस्तर वृत्त असे कि, देवीदास कॉलनीतील रोहिणी श्याम जगताप (५६) यांच्या घरातून चोरट्यांनी रोख १० हजार रुपये, १५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, देवीदेवतांच्या चांदीच्या शिक्क्यांची माळ, चांदीची कयरी घड्याल असा मद्देमाल चोरून नेला. घरमालक घरी आले त्यावेळी ही चोरी लक्षात आली. ३० मे रोजी रोहिणी जगताप यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत.



