Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !
    क्राईम

    धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !

    editor deskBy editor deskMay 31, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धुळे : प्रतिनिधी

    शहरात मन हेलावून टाकणारी धक्कादायक अशी घटना घडली आहे. पतीने चक्क पत्नीला पेस्टिसाइडचे इंजेक्शन देवुन तिचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवालात विषप्रयोग आणि डोक्याला दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तिच्या सैन्य दलातील जवान पती, पतीची प्रेयसी सह पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

    शारदा उर्फ पूजा कपिल बागुल (वय ३८ रा. प्लॉट नं.15 (ब), साईशिल्प, वक्रतुंड विहार वलवाडी, देवपूर, धुळे) असे मयत महिलेचे नाव आहे. तिचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे झाल्याचे पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झाले आहे. अधिक तपासात हे समोर आले की, पती कपिल बाळू बागुल (वय ४३) याने व इतर चौघानी पूजा हीला पकडून व तिच्या हातावर पाय ठेवून जबरदस्तीने कीटकनाशकाचं इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यानंतर तिच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यानंतर तीव्र वेदना होत असतानाही कोणतीही मदत न करता पती कपिल हा तीच्या मृत्यू पावेपर्यंत तिच्याकडे पाहत बसला. मृत्यू झाल्यानंतर तिला श्री गणेश हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र हॉस्पिटलने जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर कपिल याने इतर चौघांच्या मदतीने तिच्या अंत्यविधीची तयारी केली. याबाबत पश्चिम देवपुर पोलिसांना कळवल्यानंतर पूजाचा मृतदेह आणला गेला आणि शवविच्छेदन करण्यात आले. त्यात स्पष्ट झाले की, कपिल आणि चौघांनी तिला पकडून तिच्या हातावर पाय ठेवून तिला इंजेक्शन दिले आणि तिचा खून केला. पूजाच्या हात आणि तोंड या इंजेक्शनमुळे काळे निळे पडले होते.

    याबाबत पूजाचा भाऊ भुषण शिवाजी महाजन ( वय 35 ( रा. भोसले पार्क, कोठली रोड, भडगांव जि. जळगांव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात पती कपिल बाळू बागुल, सासरे बाळु बुधा बागुल, सासू विजया बाळु बागुल, नणंद रंजना धनेश माळी व कपिलची प्रियसी प्रज्ञा महेश कर्डीले (रा.शनीमंदीरा जवळ, वाडोभोकर रोड. देवपूर, धुळे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 (1),85,115(2),351(2)(3),352,49,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साईनाथ तळेकर करीत आहेत.

    प्लॉट घेण्यासाठी माहेरुन 2 लाख रुपये आणावेत म्हणून पूजा हिच्या मागे तगादा लावून तीचा शारिरीक मानसिक छळ करीत तिला क्रूर वागणुक देत असे. तसेच पती कपिल बागुल याचे प्रज्ञा महेश कर्डीले हिच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती झाल्या नंतर या अनैतिक संबंधात पत्नी शारदा उर्फ पुजा कपिल बागुल ही विरोध करत असे. म्हणून तीचे सासरे बाळु बुधा बागुल, नणंद रंजना धनेश माळी व प्रज्ञा महेश कर्डीले यांनी कपिल बागुल व सासू विजया बागुल यांना चिथावणी व प्रेरणा दिल्यामुळे कपिल बागुल व त्यांची आई विजया बागुल यांनी पुजा हिच्यावर विष प्रयोग करुन तीला कशाचे तरी सहाय्याने डोक्यावर मारुन तिचा खून केला आहे. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

    कपिल हा बीए, पूजा बीएससी बीएड आहे आणि प्रज्ञा बीएससी एमबीए आहे. कपिल हा लष्करात लिपिक म्हणून कार्यरत असून, त्याचं लग्न २०१० मध्ये पूजाशी झालं होतं. त्यांना त्यांना ९ वर्षाची मुलगी आणि ७ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. कपिलचे कॉलेजमध्ये असताना प्रज्ञा कार्डिले या मुलीशी प्रेमसंबंध होते. प्रज्ञाचे लग्न २००७ मध्ये एका इसमाशी झाले . प्रज्ञाला १७,१३ वर्षाच्या मुली आहेत . प्रज्ञाचा घटस्फोट अंतिम टप्यात आहे. काही वर्षी पूर्वी प्रज्ञा आणि कपिल पुन्हा भेटले आणि ते लॉजमध्ये देखील जावू लागले होते. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025

    एकाच झाडावर प्रेमीयुगुलाने संपविले आयुष्य !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.