जळगाव : प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू असून, शुक्रवारी (३० मे) चांदीच्या भावात दोन हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे ती ९७ हजार ५०० रुपयांवर आली. सोने भावात मात्र शुक्रवारी दोन वेळा बदल झाला व गुरुवारच्या तुलनेत ४०० रुपयांची घसरण होऊन ते ९५ हजार ६०० रुपयांवर आले.
तीन दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढ-उतार होत आहे. २७ मे रोजी चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ९७हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर २८ व २९ मे रोजी प्रत्येकी एक हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ९९ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. मात्र, ३० मे रोजी त्यात थेट दोन हजार रुपयांची घसरण झाली व ती ९७हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली.
दुसरीकडे २९ मे रोजी ९६ हजार रुपयांवर असलेल्या सोने भावात ३० रोजी सकाळी ६०० रुपयांची घसरण होऊन ते ९५ हजार ४०० रुपयांवर आले. मात्र, दुपारी त्यात २०० रुपयांची वाढ झाली व सोने ९५ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.


