मुक्ताईनगर प्रतिनिधी । नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या कारवाईने अवैधधंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे. आज कारवाईच्या दुसऱ्या दिवशी देखील पोतोडी शिवारात गावठी हातभट्टी उध्दवस्त केली संशयिताला ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी नुकतीच बदली करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यात सुरू असलेले अवैध धंद्यांवर अंकूश लावण्यासाठी कारवाईचा बडगा उठविला आहे. दरम्यान रविवारी तीन ठिकाणी कारवाई केल्यानंतर आज सोमवारी ११ एप्रिल रोजी दुपारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोतोडी शेत शिवारात सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास स्वत: पो.नि. शेकळे यांच्या उपस्थितीत पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, राहू बोरकर, पोहेकॉ संतोष चौधरी, गणेश मनुरे,
पोना संतोष नागरे, संदीप खंडारे, गजमल पाटील, पोकॉ रवींद्र धनगर, राहुल महाजन, रवींद्र चौधरी, विशाल पवार यांनी अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर धाडी टाकल्यो. यात एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली यात १ लाख २० हजार ७५० रूपयांचा मुद्देमालावर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.