• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

३ हजार ६०० रुपयांची लाच मागणारा मुख्याध्यापक अटकेत

editor desk by editor desk
May 30, 2025
in क्राईम, जळगाव
0
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !

एरंडोल : प्रतिनिधी

पत्नीचे मेडिकल बिल मंजूर करवून घेण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या निपाणेतील हरिहर माध्यमिक हायस्कूलमधील मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन (४५) याला ३ हजार ६०० रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. याप्रकरणी कासोदा पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

सविस्तर वृत्त असे कि, या शाळेतील एका कर्मचाऱ्याच्या पत्नीचे २३ हजार ८१५ रूपयांचे वैद्यकीय बिल होते. हे बिल मंजूर होण्यासाठी या कर्मचाऱ्याने महाजन यांच्याकडे ते सादर केले होते. हे बिल आपण आपल्या ओळखीने जिल्हा रुग्णालय व वेतन अधिक्षक, माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडून मंजूर करवून घेतो, असे आश्वासन महाजन याने दिले होते. यासाठी महाजन याने सुरूवातीला ५ हजार रूपये लाच मागितली होती. मात्र तडजोड करून ३ हजार ६०० रूपये एवढी रक्कम देण्याचे ठरले. दरम्यान, या कर्मचाऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार संदीप महाजन याच्यावर कारवाइ करण्यात आली.

याबाबत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम कासोदा पोलिस ठाण्यात सुरू होते. मुख्याध्यापक महाजन याने यापूर्वी याच कर्मचाऱ्याकडून वेतन निश्चितीच्या फरकाची २ लाख ५३ हजार ७८० रूपये एवढी रक्कम मिळवून देण्यासाठी १२ हजार ५०० रूपये लाच मागितली होती. तडजोडअंती १० हजार रूपये लाच स्विकारली होती.

याप्रकरणातही महाजन याच्यावर २७ जून २०२४ रोजी कासोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाइ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ सुरेश पाटील, पोहेकों किशोर महाजन, पो. ना. बाळू मराठे, पोकों प्रदीप पोळ यांच्या पथकाने केली.

Previous Post

उभ्या ट्रकला जबर धडक : वाहन चालकाचा जागीच मृत्यू !

Next Post

व्याजाच्या पैशाचा वाद : व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने बेदम मारहाण !

Next Post
व्याजाच्या पैशाचा वाद : व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने बेदम मारहाण !

व्याजाच्या पैशाचा वाद : व्यापाऱ्याला बुलेटवर उचलून नेऊन पाइपने बेदम मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आता अजानही मराठीतून झाली पाहिजे ;मंत्री राणेंचे विधान !
राजकारण

आता अजानही मराठीतून झाली पाहिजे ;मंत्री राणेंचे विधान !

July 17, 2025
राज्याच्या विधानसभेत हनी ट्रॅप मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग !
राजकारण

राज्याच्या विधानसभेत हनी ट्रॅप मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग !

July 17, 2025
दिंडोरी-कळवण रस्त्यावर भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू !
क्राईम

दिंडोरी-कळवण रस्त्यावर भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू !

July 17, 2025
मोठी बातमी : भाजप नेते राणेंच्या अडचणीत वाढ !
क्राईम

मोठी बातमी : भाजप नेते राणेंच्या अडचणीत वाढ !

July 17, 2025
चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई : ७ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त !
क्राईम

चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई : ७ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त !

July 17, 2025
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित
क्राईम

पाच पोलिसांना मोठा दंड : वाचा काय आहे प्रकरण !

July 17, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp