Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात पावसाचा हाहाकाराने घेतले ८ बळी !
    क्राईम

    राज्यात पावसाचा हाहाकाराने घेतले ८ बळी !

    editor deskBy editor deskMay 28, 2025No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच असून मंगळवारी मराठवाड्यातील २५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यात मायलेकींसह पुतणी असे तीन तर अहिल्यानगरात पावसामुळे भिंत कोसळून २ महिला ठार झाल्या तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वीज पडून ३ बळी गेले आहेत. नांदेड जिल्ह्यात शेतातून घरी येताना नाल्याच्या पुरात मायलेकी आणि पुतणी अशा तिघी जणी वाहून गेल्याची घटना वरवट (ता. हदगाव) येथे मंगळवारी दुपारी घडली. या घटनेत तिघींचा मृत्यू झाला. अरुणाबाई बळवंत शकर्गे (३७), दुर्गा बळवंत शकर्गे (१०) या मायलेकींसह पुतणी समीक्षा विजय शकर्गे (८) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. लातूरला मंगळवारी विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसाने मुख्य रस्त्यांवर पाणी साचले.

    गूळ मार्केट ते कव्हा रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर १० दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावासायिकांना मोठी करत करावी लागली. रस्त्यांवर दुपारी साचलेले पाणी सायंकाळपर्यंत कायम असल्याने गुडघाभर पाण्यातून वाहनधारकांना वाट काढावी लागली. काही भागात घरांमध्येही पाणी शिरले. धाराशिवमध्ये १७ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतांमध्ये पाणी साचले. तसेच मशागतीच्या कामांचा खोळंबा झाला. दरम्यान, घनसावंगी तालुक्यातील नारोळा नदीला पूर आल्याने घनसावंगी ते तीर्थपुरी या मार्गावरील वाहतूक बंद होती.अहिल्यानगरात स्लॅब, भिंत कोसळून दोघींचा मृत्यू, ४ तासांच्या पावसाने शहरात पाणीच पाणी

    मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर शहरात घराचा स्लॅब कोसळून तन्वी केदार रासने (१९) या तरुणीचा आणि कर्जत तालुक्यातील खेड गावाजवळील वस्तीवर आडोशाला बसलेल्या वृद्ध महिलेच्या अंगावर भिंत पडल्याने मृत्यू झाला. तर दुपारी चार तास झालेल्या पावसात मध्य शहरासह उपनगरातील अनेक वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरले. मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. कल्याण महामार्गावरील छोटा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. पूर्वा व वालुंबा या दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी शिरल्याने खडकीला पुराचा वेढा पडला.

    २८ ते ३० मे असे चार दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण-गोव्यात पुढील तीन दिवस काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता पुण्याच्या वेधशाळेने वर्तवली अाहे. विदर्भ आणि कोकणात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    हवामान खात्याने मान्सून अंदाजात सुधारणा केली आहे. आता या मान्सूनमध्ये देशात ९२.२ सेमी म्हणजेच १०६% पाऊस पडेल, जो दीर्घकालीन सरासरीच्या ८७ सेंमी आहे. यामध्ये ४% कमी-जास्त होण्याची शक्यता आहे, म्हणजेच कमी पातळीवरही किमान १०२% पाऊस पडेल. एप्रिलमध्ये हवामान विभागाने १०५% पाऊस पडेल आणि त्यात ५% त्रुटी राहतील असा अंदाज वर्तवला होता. मान्सूनमध्ये असाधारण पाऊस पडण्याची शक्यता असलेली राज्ये आणि क्षेत्रे म्हणजे उत्तराखंड, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, दक्षिण ओडिशा आणि दक्षिण छत्तीसगड आहेत. ज्या भागात पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी असेल त्यात संपूर्ण ईशान्य, जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचा समावेश आहे. हवामान खात्याच्या मते, जूनमध्ये १०८% म्हणजेच सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    मुख्य मालकांवर कारवाई का नाही? ; अंबादास दानवेंनी सरकारला धरले धारेवार !

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.