पारोळा : प्रतिनिधी
सबगव्हाण टोल नाक्यावर दि २५ रोजी पावणेतीन वाजेच्या सुमारास टोल भरण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाल्याने दुसऱ्या दिवशी आठ ते दहा तरुणांनी मिळून टोलनाक्यावर हुज्जत घालून कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी दहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सबगव्हाण येथे दि. २५ रोजी पावणेतीन वाजेच्या सुमारास टोल नाक्यावर चारचाकी गाडी (एमएच १०/एलएन६९९०) आली असता चालक विनायक भोई याने टोल प्रशासनातील कर्मचाऱ्यांशी टोल भरण्याच्या कारणावरून वाद घातला. याप्रकरणी दि २६ रोजी विनायक मोतीलाल भोई, भूषण भागवत सोनवणे, गोविंदा वसंत माळी महेश किरण चौधरी, ऋषिकेश महेश माळी, लोकेश संजय गायकवाड, चेतन छोटू भोड़, कैलास संजय भोई, पवन मोतीलाल भोई, सागर अशोक भोई (नशिराबाद, ता. जळगाव) व इतरांनी सबगव्हाण टोल नाक्यावर येऊन कर्मचाऱ्यांना धमकी दिली. तसेच धारदास हत्याराने टोल कर्मचारी जितेंद्र पाटील स्वप्निल मराठे, किशोर पाटील, हर्षल पाटील यांना जबर मारहाण केली