• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास तीस हजाराची लाच रंगेहात पकडले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
April 11, 2022
in क्राईम, जळगाव
0
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास तीस हजाराची लाच रंगेहात पकडले

जळगाव प्रतिनिधी । जोशीपेठेतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ३० हजाराची लाच घेताना अटक केली आहे. या कारवाईने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे.

शहरातील जोशी पेठ येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरिटी गार्डच्या नोकरीसाठी जळगाव जिल्ह्यातील तक्रारदाराने अर्ज केला होता. या कार्यालयातील शिपाई गोपाळ कडू चौधरी, (वय-५५) रा. जुना खेडी रोड, डीएनसी कॉलेज, जळगाव याने आपले कार्यालयातील वरिष्ठांशी घनिष्ट संबंध असल्याची बतावणी करत तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. व नोकरी लावून देतो असे सांगून २ लाख १० हजाराची लाचेची मागणी केली. पहिल्या टप्प्यात सोमवारी ३० हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदवली होती. जळगाव कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सोमवारी ११ एप्रिल रोजी दुपारी सापळा रचत तीस हजारांची लाच स्वीकारताना शिपाई गोपाळ चौधरी याला रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे सहाय्यक कामगार कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.

ही कारवाई जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजय बच्छाव व पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, एसआयएस दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक पाटील, मनोज जोशी, पोलीस नाईक जनार्दन चौधरी प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नसीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पवार यांनी केली.

Previous Post

मुक्ताईनगर तालुक्यात गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त

Next Post

पो.नि. शंकर शेळके यांच्या कारवाईने अवैधधंदे करणाऱ्यांमध्ये भरली धडकी

Next Post
पो.नि. शंकर शेळके यांच्या कारवाईने अवैधधंदे करणाऱ्यांमध्ये भरली धडकी

पो.नि. शंकर शेळके यांच्या कारवाईने अवैधधंदे करणाऱ्यांमध्ये भरली धडकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group