जळगाव : प्रतिनिधी
चोपडा ते यावल रस्त्यावरील गॅस पंपाजवळ २७ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दुचाकी आणि अज्ञात वाहनात झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आ हे. तर सोबतचा बसलेला तरुणही गंभीर जखमी झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील पिंटू प्रकाश सोनवणे (वय २१) हा या अपघातात जागीच ठार झाला. तर सोबत असलेला तालुक्यातील अड-ावद येथील आकाश गणेश कोळी (वय २१) हा गंभीर जखमी झाला आहे. तसेच जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील अक्षय जगन्नाथ सोनवणे याला किरकोळ मार लागला आहे. दरम्यान, चोपडा शहरातून अडावद येथे दुचाकीने जात असताना चोपडा ते यावल रस्त्यावर दुचाकी व अज्ञात वाहनात गॅस पंपाजवळ अपघात झाला. यात दुचाकी चालक पिंटू सोनवणे हा जागीच ठार झाला. तर सोबतचे आकाश कोळी हा गंभीर जखमी असून त्याला जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे. तसेच अक्षय जगन्नाथ सोनवणे याला किरकोळ मार लागला आहे.